-
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून एक ओळख प्राप्त केली.
-
मराठा समाजाचे नेते म्हणून उदयाला येत अखेर काल २० ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी राजकारणातील प्रवेश निश्चित केला आहे.
-
त्यांनी आपल्या समर्थकांना उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबत मार्गदर्शन केले.
-
जिथे त्यांच्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, तिथे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
-
काय म्हणाले जरांगे?
“आपला उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो? तसेच कोणत्या मतदारसंघात मुस्लिम-दलीत एकत्र आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. मात्र, तुम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणत्या मतदारसंघामधून कोणाचा अर्ज ठेवायचा? आणि कोणाचा अर्ज मागे घ्यायचा? हे सांगेल. पण तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरा. मी बरोबर समीकरण जुळवतो”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार (Assembly Elections 2024 ) उतरवण्याची मोठी घोषणा केली आहे. -
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे करत आहेत.
-
मात्र, त्यांची मागणी सरकारने मान्य न केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता.
-
तसेच सत्ताधाऱ्यांचे आमदार निवडणुकीत पाडणार असल्याचाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
-
त्यानंतर अखेर मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीत मराठा समाजाला हात वर करुन निवडणुकीमध्ये उमेदवार उतरायचे की नाही? असं विचारत त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्यानंतर उमेदवार निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
(सर्व छायाचित्र – लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – विधानसभा निवडणुकीआधी ज्योती मेटेंच्या हाती ‘तुतारी’, कोण आहेत ‘शिवसंग्राम’च्या नेत्या?
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य