-
मंगळवारी, संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) वक्फ विधेयकासंदर्भात बैठक झाली ज्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना निलंबित करण्यात आले. (फोटो: पीटीआय)
-
या बैठकीत हाणामारी झाल्यानंतर जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी टीएमसी खासदाराला पुढील बैठकीसाठी निलंबित केले आहे. वास्तविक, कल्याण बॅनर्जी आणि भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात हाणामारी झाली आणि त्यात कल्याण बॅनर्जीही जखमी झाले. यादरम्यान त्यांनी पाण्याची काचेची बाटली फोडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्या हाताला चार टाके पडले आहेत. (फोटो: पीटीआय)
-
कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यासोबतच ते पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. कल्याण बॅनर्जी यांच्याकडे कोट्यवधी रूपयांची मालमत्ता आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
myneta.info वेबसाइटनुसार कल्याण बॅनर्जी यांच्याकडे एक कोटींची पुस्तके आहेत. त्यांच्याकडे एकूण ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याकडे पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे एक शेतजमीन आहे जीची किंमत अंदाजे ७ लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
कल्याण बॅनर्जी यांच्याकडे कोलकाता येथे १ कोटी २० लाख रुपयांचे घर आहे. यासोबतच पश्चिम बंगालमधील उत्तरपारा हुगळी भागात त्यांच्या पत्नीच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत १० लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ग्रेटर कैलास १ मध्ये कल्याण बॅनर्जी यांच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत २ कोटी २० लाख रुपये आहे. (फोटो: कल्याण बॅनर्जी/इन्स्टा)
-
त्याचवेळी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूरमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत ३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याण बॅनर्जी यांच्याकडे एकूण ३ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता आहे. (फोटो: कल्याण बॅनर्जी/इन्स्टा)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”