-
राज्यात आता विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे.
-
सगळ्या पक्षांकडून आता उमेदवार अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु आहे.
-
हे फोटो मुंबईतील वरळी मतदारसंघातील आहेत.
-
आज सकाळपासूनच या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.
-
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
-
दरम्यान, यंदा या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरुद्द मनसेचे संदीप देशपांडे मैदानात आहेत.
-
दरम्यान आज आदित्य ठाकरे अर्ज दाखल करणार असून त्यापुर्वी शिवसैनिकांकडून मोठी जय्यत तयारी केली आहे.
-
(सर्व फोटो – Express photo by Pradip Das, 24th Oct 2024, Mumbai.)

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे मोठी घोषणा करत म्हणाल्या…