-
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.
-
सर्वच पक्षांच्या आणि आघाड्यांच्या उमेदवार निवडी ते उमेदवार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर आणखी काही याद्या प्रसिद्ध होणार आहेत.
-
दरम्यान या याद्यांवरून राज्यात काही प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत हेही लक्षात येत आहे, एवढच नाही तर नव्या पिढीकडून फाईट दिली जाणार असल्याचंही दिसून येत आहे. कोणत्या आहेत या जागा ज्यावर राज्याचं लक्ष असेल.
-
बारामती
बारामती विधानसभा मतदारसंघ यावेळी खूप चर्चेत आहे.
येथे अजित पवार यांचं वर्चस्व पाहायला मिळतं परंतु लोकसभा गमावल्यानंतर आता अजित पवार इथे विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. -
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने इथे यूगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. यूगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे नव्या पिढीकडून जुन्या पिढीला इथे फाईट दिली जाणार आहे.
-
माहीम
माहीम मतदारसंघात मनसे नेते राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. त्यांचीही ही पहिलीच निवडणूक असून मनसेच्या पहिल्याचं यादीत त्यांचे नाव आले होते. -
शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर अमित ठाकरेंच्या विरोधात माहीममध्ये लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
वरळी
आदित्य ठाकरे वरळीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये विजय मिळवला होता. तेव्हाच्या महायुतीमध्ये ते सामील होते, परंतु आता परिस्थिति वेगळी असल्याने यंदाच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवता येईल का ही पाहणे महत्वाचे असेल. -
आदित्य यांच्या विरोडात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु इथे भाजपाचा उमेदवार कोण असेल ही अजून तरी स्पष्ट झाले नाही.
हेही पाहा- ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकाने अभिनेता अल्लू अर्जुनबरोबरच केला होता पहिला चित्रपट, जो ठरला होता ‘सुपर-डुपर हिट!’

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”