-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील महाराष्ट्रातील सर्वात तरूण उमेदवार ठरले आहेत.
-
रोहित पाटील हे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आहेत.
-
त्यांना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिली आहे.
-
त्यांनी नुकताच त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
-
दरम्यान, आर. आर. पाटील यांनीही वयाच्या २७ व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती.
-
याबद्दलची माहिती रोहित पवारांनी एका मुलाखतीत दिली आहे.
-
आर. आर. पाटील यांची राजकीय कारकिर्द १९७९ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्यापासून सुरू झाली. ते १९७९ ते १९९० पर्यंत जिल्हा परिषद सदस्य होते, त्यानंतर १९९० पासून ते सतत तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले.
-
आर. आर. पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते.
-
दरम्यान, यंदा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो साभार रोहित पाटील सोशल मीडिया)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित