-
सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरम येथे आयोजित एका मंदिर उत्सवादरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भीषण अपघात झाला आहे. (पीटीआय फोटो)
-
या अपघातात १५० हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
उत्सवादरम्यान फटाके फोडले जात असताना ‘अंजूथंबलम वीरकवू मंदिरा’जवळ ही घटना घडली. (पीटीआय फोटो)
-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कलियाट्टम’ या धार्मिक कार्यक्रमादरम्यान हा अपघात झाला, ज्याला ‘थेय्याम’ असेही म्हणतात. (पीटीआय फोटो)
-
या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले होते. फटाक्यांच्या साठवणुकीच्या शेडमध्ये ठिणगी पडल्याने आग लागली आणि मोठा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. (पीटीआय फोटो)
-
दिवाळीसारख्या सणाच्या आधीच घडलेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. जखमींना कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (पीटीआय फोटो)
-
घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख व इतर अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. (पीटीआय फोटो)
-
रुग्णालयात दाखल जखमींच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक समुदायाने पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंना मदत करण्यासाठी अनेकजण एकजुटीने पुढे येत आहेत. (पीटीआय फोटो)
-
बाधितांसाठी विशेष मदत मोहीम राबवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्याचबरोबर याप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीच्या आठ सदस्यांवर कारवाई केली आहे. (पीटीआय फोटो)
-
त्यांनी परवानगीशिवाय फटाक्यांची आतषबाजी केली आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले, असा आरोप आहे. याप्रकरणी अजामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे फटाक्यांच्या साठ्यात आग लागल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. स्थानिक प्रशासन या अपघाताची कसून चौकशी करत आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. (पीटीआय फोटो)
हेही पाहा – Photos : झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाचे लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीनिमित्त सुंदर …
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस