-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील प्रख्यात हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. या भव्य लग्न सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने पोहोचले होते. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेत आले आहेत. चला याबद्दल जाणून घेऊयात.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर असून, तिथे त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. दरम्यान सरकारी अधिकृत कार्यक्रमांव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी एका लग्न समारंभालाही हजेरी लावली. गुजरातचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांचा मुलगा द्रव्या ढोलकिया आणि जान्हवी यांचा हा विवाह सोहळा होता, ज्यात पंतप्रधानांनी हजेरी लावून या नवविवाहित जोडीला त्यांचे आशीर्वाद दिले.
-
हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल पीएम मोदींचे आभार व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये ते म्हणाले “आज जेव्हा द्रव्या आणि जान्हवी त्यांच्या सहजीवनाला सुरुवात करत असताना त्यांच्या या आनंदाच्या क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली, ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.”
-
“त्यांची उपस्थिती आणि या जोडप्याला मनापासून आशीर्वाद मिळाल्याने आमचे कुटुंब कृतज्ञतेने आणि अभिमानाने भरून गेले आहे. आहे. या अविस्मरणीय दिवसाला आम्ही कधीही विसरू शकत नाहीत. हा दिवस आणखी खास बनवल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानतो.”, अशा भावना सावजी ढोलकीयांनी या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
-
हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण त्यांनी जेव्हा ते पंतप्रधान मोदींना दिल्लीत भेटले तेव्हा दिले होते. अशी माहितीही त्यांनी दिली.
-
दरम्यान, द्रव्या ढोलकिया आणि जान्हवी यांचा भव्य विवाह गुजरातमधील दुधाला या ठिकाणी पर पडला. या लग्नाचा एक व्हिडिओही त्यांनी जारी केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी नव्या जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत.
-
भारतमाता सरोवराचेही केले उद्घाटन
दरम्यान, दुसऱ्या एका पोस्टमध्ये सावजी ढोलकीया यांनी सांगितले की, सात वर्षांच्या मेहनतीनंतर हा लग्नसोहळा पार पडला. -
या पोस्टमध्ये सावजी म्हणाले, “सात वर्षांच्या अथक प्रतिक्षेनंतर आज हे लग्न विनाविलंब पार पडले. जेव्हा आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली तेव्हा त्यांना दुधाळा येथील भारतमाता सरोवराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते त्याशिवाय या लग्नासाठीही निमंत्रण दिले होते.”
-
दरम्यान, सावजी ढोलकिया हे तेच उद्योगपती आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी महागड्या भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या वर्षीही त्यांच्या डायमंड कंपनीने दिल्लीतील कर्मचाऱ्यांना ६०० कार गिफ्ट केल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते काही कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.
-
(सर्व फोटो साभार- सावजी ढोलकीया फेसबुक पेज)

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”