-
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण आणि हिंदू समुदायाच्या नेत्यांवरील देशद्रोहाचे आरोप मागे घेण्याच्या मागणीसाठी हजारो हिंदू लोक शुक्रवारी (१ नोव्हेंबर) रस्त्यावर उतरले. (एपी फोटो)
-
चट्टोग्राममध्ये सुमारे ३०,००० लोक जमले होते, त्यांनी हक्क आणि संरक्षणासाठी घोषणाबाजी केली तर पोलीस आणि सैनिकांनी परिसर सुरक्षित केला. अशाच प्रकारची निदर्शने देशभरात विविध ठिकाणी करण्यात आली. (एपी फोटो)
-
ऑगस्टमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांचे धर्मनिरपेक्ष सरकार उलथून टाकल्यापासून, देशातील हिंदू लोकांनी त्यांच्यावर २,००० हून अधिक हल्ले झाल्याचा दावा करत त्यांच्याविरुद्ध हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी ही आकडेवारी अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटले आहे. (एपी फोटो)
-
बांगलादेशच्या लोकसंख्येच्या ८% हिंदूंचे म्हणणे आहे की त्यांना कट्टर इस्लामी गटांकडून धोका आहे. (एपी फोटो)
-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आंतरराष्ट्रीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या हिंसाचाराचा “असंस्कृत” असे म्हणून निषेध केला आहे. (एपी फोटो)
-
अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदा, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि अल्पसंख्याकांविरुद्धच्या गुन्ह्यांवर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायाधिकरण या मागण्यांसाठी हिंदू कार्यकर्ते ऑगस्ट महिन्यापासून निदर्शने करत आहेत. (एपी फोटो)
-
दरम्यान, चट्टोग्राममधील निदर्शनावेळी १९ हिंदू नेत्यांवर देशद्रोहाचे आरोप केले गेले आणि परिस्थीती आणखीनच चिघळली. (एपी फोटो)
-
२५ ऑक्टोबरच्या रॅलीनंतर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाच्या वर भगवा ध्वज लावण्यात आला होता. (एपी फोटो)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन