-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
-
भाजपाच्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांनी लक्ष वेधलं आहे, चला जाणून घेऊयात भाजपाच्या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे?
-
लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरुन २१०० करणार, वृद्ध पेन्शन योजनेत वाढ १५०० वरुन आता २१०० रुपये
-
जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवणार
-
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा, शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणणार
-
१ लाखांपेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या देणार, २५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य, फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असणार
-
२०२७ पर्यंत ५९ लाख लखपती दीदी बनवणार
-
महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार, विद्या वेतनाच्या माध्यमातून १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार
-
गडकिल्ल्यांसाठी प्राधिकरण तयार करणार, महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार
-
दरम्यान, ‘मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसऱ्यांदा जनादेश द्यावा, अशी विनंती करतो.”, असं जाहीरनामा प्रकाशनावेळी अमित शाह म्हणाले आहेत. (सर्व फोटो – लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- Photos : ‘रानबाजार’ फेम मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवारचं अजिंठा लेणीमध्ये आकर्षक फोटोशूट
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”