-
महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
-
नुकताच भाजपानेही त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
-
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्याबद्दल जाणून घेऊया.
-
महिलांसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी, राज्यभरात महिलांना बस प्रवास मोफत, मासिक पाळीत महिलांना दोन दिवस सुट्टी, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला ३००० रूपये देणार
-
सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला ४००० रूपये भत्ता देणार, राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती करणार, एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन ४५ दिवसांत निकाल
-
संजय गांधी निराधार योजनेतून २००० रुपये, शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवणार, सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय
-
६ गॅस सिलेंडर प्रत्येक ५०० रुपयांत देणार, ३०० युनिट वापरणाऱ्यांचे १०० युनिटचे बील माफ करणार, शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार
-
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करणार, २५ लाखांची आरोग्य विमा योजना लागू करणार
-
त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्या जाहीरनाम्यातील कोणत्या गोष्टी मतदारांना भावणार आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी निकालातून स्पष्ट होईल.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यातील ‘या’ मुद्द्यांनी वेधलं लक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत प्रकाशन

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी