-
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात सगळे पक्ष उतरले आहेत. मुख्य पक्षांचे जाहीरनामे प्रकाशित झाले आहेत. त्यातच आज मनसेने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून आपला विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा जाहीर केला आहे.
-
मनसेच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे
राज ठाकरेंनी चार भागात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे. -
दुसरा भाग – दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता
-
तिसरा भाग – राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण
-
चौथा भाग – मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजिटल जगात मराठी जागतिक व्यावसीफाटवर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ.
-
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर केली टीका
शिवरायांच्या मंदिरांपेक्षा विद्यामंदिर गरजेची
गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी विद्यामंदिरे उभारण्याची गरज आहे.मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच प्रशासनापासून ते उच्च शिक्षणामध्ये मराठी भाषा असली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्दव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी राज्यात शिवाजी महाराजांची मंदिरे बांधू असं वक्तव्य केलं होतं. -
‘शरद पवार महाराष्ट्राचा नाही तर तालुक्याचा नेता’
शरद पवारांच्या बारामतीत गेले की लक्षात येईल, की पवारांनी बारामतीत किती उद्योग आणले आहेत मग महाराष्ट्रात का नाही आणू शकले? मग आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा नेता का म्हणू? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीकास्त्र डागले. महाराष्ट्रात उद्योगधंदे आणले, रोजगार दिला तर तो नेता महाराष्ट्राचा नेता. स्वतःच्या तालुक्यांमध्ये विकास करणारा तो तालुक्याचा नेता, असेही राज ठाकरे म्हणाले. -
दरम्यान राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे तर निकाल २३ तारखेला लागणार आहेत.
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…