-
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्यामुळे काल आणि आज दिवसभर प्रचाराला जोर लावताना राजकीय पक्ष पाहायला मिळाले. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तेलुगु सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण राज्यात दाखल झाले आहेत. काल त्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
हे फोटो पुण्यातील रोड शोचे आहेत. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यांनी लातूरलाही सभा घेतली आहे. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सभेत मराठीतून भाषण केले. अगदी काही मिनिटांच्या मराठी शब्दांनी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिकून घेतली. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
“मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा. संतांची भूमी, वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र, या भूमीतील संतांना, छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नमन करतो. माझ्या लाडक्या भावांना, लाडक्या बहिणींना नमस्कार करतो. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आलं, याचा मला आनंद आहे. रामराम महाराष्ट्र. या मराठ्यांच्या भूमीत सन्मान आहे. स्वराज्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे, असे पवन कल्याण म्हणाले.” अशा शब्दांत पवन कल्याण यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे या सुपरस्टारची समाजमाध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान, सगळे राजकीय पक्ष प्रचार उत्तम करत असले तरी मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार? हे निकाल लागल्यावरचं स्पष्ट होणार आहे. राज्यात २० नोव्हेंवर रोजी मतदान आहे, तर २३ तारखेला निकाल आहेत. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”