-
गेले महिनाभर कर्णकर्कश प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी (२० नोव्हेंबर) होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. (Express Photo By Sankhadeep Banerjee)
-
राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चुरस आहे. (Express Photo By Sankhadeep Banerjee)
-
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा २१० कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोथरूड मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतदान केले.
-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मतदानाचा अधिकार बजावला. अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
-
बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी बारामतीत काटेवाडी येथे मतदान केले. त्यावेळी त्यांच्याबरोबर वडील श्रीनिवास पवार आणि आई शर्मिला पवार.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
-
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
-
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
-
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C P Radhakrishnan) यांनी कुलाबा मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
-
कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मतदान केले.
-
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी भोसरी, दिघी रोड येथील मतदान केंद्रामध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी वैशाली गव्हाणे, पुष्पाताई गव्हाणे, विराज गव्हाणे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ