-
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासह नांदेड लोकसभेचा आज निकाल जाहीर होणार आहे.
-
महाराष्ट्रासह झारखंडमधील ८१ विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.
-
झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले.
-
तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात सर्व २८८ जागांसाठी मतदान पार पडले.
-
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
-
दुपारी १ वाजेपर्यंत कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
-
दोन्ही राज्यांत निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये विविध अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
-
त्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “ते शिवसेनेचे…”