-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतमोजणी सुरू असताना महायुतीची घोडदौड पाहून ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत विक्ट्री साईन दाखवले. (फोटो क्रेडिट: पीटीआय).
-
राज्यातील बहुचर्चित बारामती मतदारसंघात अजित पवारांना विजय मिळाला तेव्हा त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या ठेक्यावर ताल धरला. (एक्सप्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी विजयालायक आघाडी मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनासोबत जल्लोष सुरू केला. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
त्याचवेळी, काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला. महाविकास आघाडीला या निकालांमध्ये जोरदार फटका बसला आहे. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार मतमोजणी केंद्रावर जल्लोष करताना. (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
-
पर्वती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांचे शनिवारी मतमोजणी केंद्रावर आगमन झाले. (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
-
खडकवासला मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार भीमराव तापकीर मतमोजणी केंद्रावर जल्लोष साजरा करताना. (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
-
नागपुरात भाजपा कार्यकर्ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ साठी रांची येथे झालेल्या मतमोजणीचे थेट प्रक्षेपण भाजपा कार्यकर्ते पाहताना. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
रांचीमधील विधानसभा निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतल्यानंतर खिजारी विधानसभा जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार राजेश कछाप यांनी विक्ट्री चिन्ह दाखवले. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश कुमार बैठा, रांचीमध्ये विजयाचे विक्ट्री दाखवत आहेत. (फोटो क्रेडिट: PTI)
-
झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी रांचीमध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीत निर्णायक आघाडीचा आनंद साजरा केला. (फोटो क्रेडिट: PTI)
-
कानपूरमधील सिसामाऊ विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपा उमेदवार सुरेश अवस्थी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
पाटण्यात भाजपा समर्थक बिहार विधानसभा पोटनिवडणुकीचा विजय साजरा करत आहेत (फोटो क्रेडिट: पीटीआय)
-
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे मनोज घोरपडे विजयी झाल्यानंतर कराडमधील भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. (फोटो क्रेडिट: पीटीआय)
-
बेंगळुरू, कर्नाटकमधील तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्य आनंद व्यक्त करताना. (फोटो क्रेडिट: पीटीआय)
-
पश्चिम मेदिनीपूरमध्ये मेदिनीपूर सदर पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार सुजॉय हाजरा यांच्या विजयाचा आनंद तृणमूल काँग्रेस समर्थकांनी साजरा केला. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
सुजॉय हाजरा यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना सहकारी. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
पटनामधील बेलागंज बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत जेडीयू समर्थकांनी आपला विजय साजरा केला. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
-
नागपूरात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतूच्या विजयाचा आनंद साजरा करताना भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी कमळ हातात धरले. (फोटो क्रेडिटः पीटीआय)
हेही पाहा- वरळीत आदित्य ठाकरेंच्या मशालीचा भडका, झाले दुसऱ्यांदा आमदार!

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल