-
यंदा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळाली.
-
या दमदार लढाईत रोहित पाटील यांनी जोरदार विजय प्राप्त केला आहे.
-
रोहित पाटील हे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे चिरंजीव आहेत.
-
त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची झाली होती.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.
-
त्यांना ही उमेदवारी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मिळाली होती.
-
या संधीचं त्यांनी सोन केलं आहे. रोहित पाटील यांनी २७ हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांचा पराभव केला आहे.
-
त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असून राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो साभार रोहित पाटील सोशल मीडिया)
हेही पाहा- Photos : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल