-
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालांवर वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
-
काल (२३ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले.
-
या निकालांमध्ये भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे.
-
तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर छोट्या पक्षांना फटका बसला आहे.
-
प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला यंदाही खाते उघडता आले नाही.
-
दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी एक ट्वीट करत या निकालांवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
-
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
”बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ हे आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात भाजपचे नवनिर्मित कमंडल राजकारण होते.” -
“महाविकास आघाडीचे एक-जातीय राजकारण, आरक्षणावरील मौन यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला त्यांचे नूतनीकरण केलेले कमंडल कथन मजबूत करण्यास मदत झाली.” – प्रकाश आंबेडकर
-
“वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष होता ज्याने फुले, शाहू, आंबेडकर आणि मंडल – सामाजिक न्याय आणि समता यावर निवडणूक लढवली.” – प्रकाश आंबेडकर
-
“आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे पण, या निकालातील अनियमिततेची चौकशी झाली पाहिजे. आज भाजपाचा विजय म्हणजे सामाजिक न्यायाचा पराभव आणि कट्टर हिंदुत्वाचा विजय होय.” – प्रकाश आंबेडकर
-
दरम्यान, राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून मोठा विजय मिळविला आहे.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- Photos : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण