-
काल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये जय पराजयचे मोठे चित्र काल राज्याने पाहिले आहे.
-
येवला लासलगाव मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ विजयी झाले.
-
विजयानंतर त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी जमलेले पाहायला मिळाले.
-
या भव्य स्वागताचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत.
-
मोठा हार यावेळी स्वीकारताना छगन भुजबळ
-
दरम्यान, छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून निवडणूक लढवली.
-
यावेळी त्यांना २६ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
-
तर १,३५,००० इतके एकूण मतदान त्यांना झाले आहे.
-
या विजयानंतर कार्यकर्ते आणि भुजबळांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे.
-
त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा पराभव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार – छगन भुजबळ फेसबुक)
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली