-
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Result: कोणाचा भाऊ, मुलगा, मुलगी, सून… नेतेमंडळींच्या नात्यागोत्यातील असे जवळपास ६० जण विधानसभेत निवडून आले आहेत.
-
विशेष म्हणजे भावांच्या जोड्या आणि एक बहीणभावाची जोडीही नव्या सभागृहात असेल.
-
शनिवारी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालांत निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी ६० पेक्षा अधिक जण हे कोणत्या ना कोणत्या राजकीय घराण्याशी संबंधित आहेत.
-
उदय सामंत (Uday Samant) आणि किरण सामंत (Kiran Samant) या भावांची जोडी विधानसभेत दिसेल.
-
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) ही मावसभावांची जोडीही यावेळी एकाच सभागृहात असेल.
-
नीलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) या भावांची जोडी विधानसभेत दिसेल.
-
विशेष म्हणजे राणे बंधूंपैकी एक जण भाजप, तर दुसरा शिवसेनाच्या (शिंदे) तिकिटावर निवडून आले आहेत.
-
भाजप नेते रावसोहब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे (Santosh Danve) आणि कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) या बहीणभावाची जोडी या विधानसभेत दिसेल.
-
संतोष दानवे भाजपमधून आणि संजना जाधव शिंदे गटातून निवडून आल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया) हेही पाहा : राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल