-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे यावेळी उपस्थित होते.
-
महायुतीचे प्रमुख नेते थोड्यावेळापुर्वी राजभवनात दाखल झाले होते.
-
एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला..
-
दरम्यान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.
-
आज महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची मुदत (२६ नोव्हेंबर) संपली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
दरम्यान यावेळी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते.
-
त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे.
-
तथापी मुख्यमंत्रिपदाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी भाजपाची हायकमांड याबाबतचा निर्णय लवकरच घेण्याची शक्यता आहे.
-
(सर्व फोटो – लोकसत्ता)
हेही पाहा – Maharashtra Assembly Elections 2024: जय-पराजयानंतर आदित्य, अमित हे ठाकरे बंधू काय म्हणाले?

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा