-
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबरोबर आज (२८ नोव्हेंबर) महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री व सत्तावाटपावर निर्णय घेण्यात येणार आहे.
-
या साऱ्या घडामोडींनुसार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीच मुख्यमंत्रीपदी (Maharashtra Chief Minister) निवड केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
-
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला तरी बुधवारी दुपारपर्यंत नवीन सरकार स्थापण्यासाठी महायुतीत काहीच हालचाली दिसत नव्हत्या.
-
मात्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल, असे जाहीर केल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन तीन दिवसांनंतर मौन सोडले.
-
विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या शैक्षणिक (MLA Education) माहितीवर नजर टाकूया…
-
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांपैकी साक्षर शिक्षित दोन आमदार आहेत.
-
सहा आमदारांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे.
-
महाराष्ट्राच्या विधानसभेत २० आमदार आठवी पास झालेले आहेत.
-
दहावी (SSC) पास झालेले एकूण आमदार ३१ आहेत.
-
४८ आमदारांनी इयत्ता बारावीपर्यंत (HSC) शिक्षण घेतले आहे.
-
६५ आमदार पदवीधर (Graduation) आहेत.
-
३९ आमदारांनी पदव्युत्तर पदवी (Post Graduation) प्राप्त केली आहे.
-
महाराष्ट्राच्या विधानसभेत सात आमदार डॉक्टरेट (Doctorate) आहेत.
-
डिप्लोमा (Diploma) १४ आमदारांनी केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया आणि Pexels) हेही पाहा : आदिती तटकरे ते श्रीजया चव्हाण; एकाच घरात आमदार-खासदार, घराणेशाहीला ऊत
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”