-
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: वडाळा मतदारसंघातून (Wadala Constituency) भाजपाचे आमदार (BJP MLA) कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यंदा नवव्यांदा निवडणूक जिंकले आहेत.
-
१९९० पासून २००४ पर्यंत शिवसेनेतून (Shivsena) कोळंबकर यांनी निवडणूक जिंकली.
-
पहिल्याच निवडणुकीत कोळंबकर यांनी तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. तेव्हापासून त्यांनी २०२४ सलग निवडून आले आहेत.
-
२००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना सोडली. कोळंबकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता.
-
राणे यांच्याबरोबर कोळंबकर यांनीही काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आणि पुन्हा पोटनिवडणुकीत ते निवडून आले.
-
२००६ ते २०१४ या काळात झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आणि मतदार संघावर आपले वर्चस्व राखले.
-
२०१४ मध्ये मोदी लाट असताना कोळंबकर यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याविरुद्ध ८०० मतांनी, निसटता विजय मिळवला.
-
कोळंबकर यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून २०१९ मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली होती.
-
सर्वसामान्य शिवसैनिक ते आमदार (MLA) असा त्यांचा प्रवास आहे.
-
कालच (२७ नोव्हेंबर) कालिदास कोळंबकर यांचा लेकाचा शाही विवाहसोहळा (Son Grand Wedding Ceremony) पार पडला.
-
कोळंबकर यांचा धाकटा लेक कौस्तुभने (Kaustub Kolambkar) तन्मयी कुमठेकरबरोबर (Tanmaye Kumthekar) लग्नगाठ बांधली.
-
रजत सोनोने या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कौस्तुभ व तन्मयीच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
कौस्तुभ व तन्मयीचा हा शाही विवाहसोहळा बीकेसीतील एमएमआरडीएच्या ग्राउंडवर (BKC Bandra MMRDA Ground) संपन्न झाला.
-
या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी (Maharashtra Politicians) हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया आणि Pexels) हेही पाहा : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण माहिती आहे का?

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा