-
Maharashtra Assembly Election Results 2024: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), दोन्ही माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawae) यांची दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींबरोबर गुरुवारी रात्री उशिरा बैठक झाली.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील उपस्थित होते.
-
त्यानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजधानीत घडामोडींना वेग आला आहे.
-
अजित पवारांच्या पक्षाचे (NCP) १०० टक्के आमदार करोडपती आहेत.
-
भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shivsena) ९८ टक्के आमदार करोडपती आहेत.
-
काँग्रेसचे साजिद पठाण (Sajid Khan Pathan) सर्वात गरीब आमदार असून त्यांची एकूण मालमत्ता फक्त ९ लाखांची आहे.
-
भाजपचे शाम खोडे (Shyam Khode) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची मालमत्ता अनुक्रमे ३१ लाख आणि ६५ लाख रुपये आहे.
-
घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे परगा शाह (Parag Shah) हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत.
-
आमदार पराग शाह यांनी त्यांची संपत्ती ३ हजार ३८३ कोटी असल्याचे जाहीर केले.
-
मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी रुपये आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आमदार/सोशल मीडिया)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”