-
ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत होते.
-
त्यांच्या भेटीसाठी राज्यातील राजकारणी पोहोचले होते. शरद पवारांपाठोपाठ अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील आंदोलनस्थळी हजेरी लावली होती.
-
लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं आढाव यांनी जाहीर केलं होतं.
-
त्यानुसार ते तीन दिवसांपासून आंदोलन करत होते. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला होता. आज (३० नोव्हेंबर) त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता.
-
यावेळी शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या भूमिका माडल्या. कोण काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
-
आज सकाळी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या भेटीनंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला, ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.”
-
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली होती. तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.
-
त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्हाला त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करता येत नाही”.
-
बाब आढावांची भेट घेण्याकरता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्यावेळापुर्वी पुण्यात दाखल झाले होते.
-
यावेळी ते म्हणाले, “मला असं वाटतंय की मुद्दाम आम्ही करतोय ते बरोबर करतोय हे सांगणारं कोणीतरी वडिलधारं असावं लागतं. ते काम तुम्ही केलंय. पण आता तुम्ही आत्मक्लेश करू नका. हा आत्मक्लेश अख्ख्या महाराष्ट्राचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बाबा आढाव यांचं उपोषण सोडलं. (सर्व फोटो- लोकसत्ता टीम)
हेही पाहा- ‘या’ सेलिब्रिटींसाठी २०२४ हे वर्ष कठीण होते, घटस्फोट किंवा ब्रेकअप करून संपवले प्रेमाचे नाते

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…