-
राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली.
-
कोट्यवधी मतदारांनी मतदान केले.
-
निकालांमध्ये महायुतीला बहूमत मिळाले. दरम्यान ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधीही पार पडणार आहे.
-
दरम्यान प्रत्येक निवडणुकीमध्ये काही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय होतो तर काही उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट जप्त होते. परंतु, डिपॉझिट म्हणजे नक्की काय असते? ते जप्त करण्याचे कारण काय? नेमकी किती रक्कम जप्त होते? त्याविषयी जाणून घेऊ.
-
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार, संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम जमा करणे बंधनकारक असते. वेगवेगळ्या निवडणुकीसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. आरक्षणांतर्गत असलेल्या उमेदवाराला ही रक्कम कमी असते.
-
संसदीय निवडणूक लढविण्यासाठी २५,००० रुपये आणि विधानसभा निवडणुकीसाठी १०,००० रुपये, अशी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. ही रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा केली जाते आणि या रकमेला निवडणुकीतील सुरक्षा ठेवही म्हणतात.
-
निवडणूक लढविण्यासाठी केवळ गंभीर असलेल्या उमेदवारांनीच नामांकन दाखल केल्याची खात्री करण्यासाठी अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे.
-
उमेदवारीचा अर्ज दाखल करतानाच ही रक्कम भरावी लागते. देशात मुक्त आणि निष्पक्ष संसदीय आणि विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक प्रकारची पावले उचलली जातात. सुरक्षा रक्कम जमा करणे हादेखील त्याचाच एक भाग आहे.
-
अशावेळी डिपॉझिट रक्कम जप्त होते
उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. -
याचा अर्थ असा की, ज्या उमेदवाराने २५,००० रुपये किंवा १०,००० रुपये रक्कम जमा केली असल्यास, त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जात नाही.
-
उदाहरण
जर विधानसभेच्या जागेवर एकूण २,००,००० मते पडली, तर सुरक्षा ठेव वाचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी एक-षष्ठांश मते मिळवावी लागतील. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला ३३,३३२ पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे. -
१९५१ ते ५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी जवळपास ४० टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती.
-
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३४५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. (सर्व फोटो प्रतिकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- Photos : उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी सोडलं उपोषण; शरद पवार, अजित पवारांनी घेतली होती भेट

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य