-
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री (Chief Minister) होणार असून त्यांच्या नावावर भाजपा (BJP) पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.
-
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्रीपद (Deputy Chief Minister) स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहखाते (Home Ministry) मिळावे, या मागणीवर ते ठाम असून भाजपाची त्यास तयारी नाही.
-
त्यामुळे आता गृहखात्यावरून तिढा असून हे खाते कोणाकडे जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.
-
भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता असून त्या वेळी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल.
-
एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीतच अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून भाजपाने शपथविधी समारंभ ५ डिसेंबरला आयोजित करण्याची घोषणा केली.
-
राज्याचं मुख्यमंत्र्यांना दरमहा किती पगार (Salary) मिळतो, याबद्दल आपण जाणून घेऊया…
-
देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्याला मिळणाऱ्या वेतनाचा आकडा वेगळा आहे.
-
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३.४ लाख रुपये प्रतिमहिना यासोबतच आमदाराचे एका महिन्याचे वेतन पगार म्हणून मिळते.
-
याशिवाय मुख्यमंत्र्यांना प्रवास भत्ता, मोबाईल बील भत्ता असा खर्चदेखील दिला जातो.
-
पगाराव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना मोफत वैद्यकीय उपचार, प्रतिपूर्ती आणि मोफत निवासाचा लाभ, वाहन सुविधा अशा अनेक सुविधा दिल्या जातात.
-
सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना एका महिन्याचा मूळ पगार साधारण १ लाख ८० हजार इतका आहे.
-
पगाराव्यतिरिक्त आमदारांना महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे.
-
(टीप: वरील फोटो गॅलरी ही प्राप्त माहितीवर आधारित आहे. त्यातील माहितीशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही.)
-
(सर्व फोटो सौजन्य : आमदार/सोशल मीडिया)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”