-
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन उद्या (६ डिसेंबर) आहे. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
त्याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातून मुंबईमध्ये भीम अनुयायी येत आहेत. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
हे फोटो मुंबईतील शिवाजी पार्क येथील आहेत. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
प्रशासनाने या ठिकाणी मोठे पँडॉल तयार केले आहेत. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
तसेच विविध सेवाभावी संस्थांकडून अनुयायांना भोजनदानही दिले जात आहे. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
६ डिसेंबर १९५६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले, तेव्हापासून मुंबईमध्ये दरवर्षी न चुकता बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या दादर येथील चैत्यभूमी या समाधी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान चैत्यभूमीवर अभिवादनासाठी अनुयायांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
या ठिकाणी विविध साहित्यांचीही विक्री पाहायला मिळते, पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
भोजनदान करताना अनुयायी. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
हेही पाहा-

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी