-
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे.
-
याच निमित्ताने मुंबईतील दादर येथील बाबासाहेबांच्या चैत्यभूमी या स्मारकावर मुख्यमंत्र्यांसहित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
-
बाबासाहेबांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर अभिवादन करताना
-
चैत्यभूमीवर अभिवादन करत असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यपाल सीपी राधाकृष्णन व अन्य राजकीय नेते, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
-
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल होत असतात.
-
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते.
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत असलेल्या भीम अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे निवासासाठी सोय केली जाते.
-
यंदाही मूलभूत गरजांची तात्पुरती व्यवस्था करून चैत्यभूमी जवळील शिवाजी पार्क मैदानावर अनुयायांना व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली