-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज ८४ वर्षांचे झाले. सकाळपासूनच लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र अजित पवार यांचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. वास्तविक, अजित पवार आपल्या संपूर्ण कुटुंबासह शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरीता पोहोचले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
यावेळी अजित पवार त्यांच्या पत्नी आणि मुलासह उपस्थित होते. खरे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या गोंधळानंतर आता मंत्रिपदाच्या वाटपावरून गदारोळ सुरू असताना, शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार गेले आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अजित पवार जितके मोठे नेते आहेत तितकेच ते श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
myneta.info नुसार, अजित पवार यांच्या नावावर तीन शेतजमिनी आहेत ज्यांची किंमत सुमारे 1 कोटी 6 लाख रुपये आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे 12 कोटी 14 लाख रुपयांची शेतजमीन आहे. दोघांच्या नावे 13,21,47,740 रुपये किमतीची शेतजमीन आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
याशिवाय अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर कोट्यवधींची बिगरशेत जमीनही आहे. अजित पवार यांच्याकडे 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बिगरशेती जमीन आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे २३ कोटी रुपयांची बिगरशेती जमीन आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण 37,58,88,213 रुपयांची बिगरशेती जमीन आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
myneta.info या वेबसाइटनुसार अजित पवार यांच्या नावावर एक व्यावसायिक इमारत आहे ज्याची किंमत सुमारे 11 कोटी रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
निवासी घरांच्या बाबतीतही अजित पवार यांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षा जास्त घरे आहेत. अजित पवारांच्या नावावर नऊ कोटी रुपयांचे घर आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावावर 23 कोटींहून अधिक किमतीचे घर आहे. दोघांकडे 35,85,12,136 रुपयांची घरं आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
जर आपण शेतजमीन, बिगरशेती जमीन, व्यावसायिक इमारती आणि निवासी घरे यांची एकूण किंमत पाहिली तर सध्या त्यांची किंमत 97,94,68,392 रुपये इतकी आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर myneta.info वेबसाइटनुसार त्यांची एकूण संपत्ती 124 कोटी रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
हेही पाहा- Photos : मर्सिडीज गाडीबरोबर हॉट लेडी; बबिताजीचं नवं फोटोशूट पाहिलं का?
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य