-
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम नोंदवण्यात आला.
-
विविध निकषांवर मूल्यमापन करून ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा करून प्रमाणपत्र प्रदान केले.
-
या विश्वविक्रमासाठी ४,१८९ पुस्तकांचा वापर करण्यात आला.
-
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
-
या अनुषंगाने विश्वविक्रम नोंदवण्याच्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अॅड. मंदार जोशी, डॉ. संजय चाकणे, गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत अधिकारी प्रवीण पटेल, मिलिंद वर्लेकर या वेळी उपस्थित होते.
-
विश्वविक्रमी कलाकृतीसाठी नीलकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला.
-
विश्वविक्रमासाठीची कलाकृती किमान एक हजार चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, पाच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृतीचे मूल्यमापन करण्यात आले.
-
त्यानुसार साकारलेली कलाकृती पात्र ठरून विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, अशी घोषणा प्रवीण पटेल यांनी केली.
-
वाचनाने व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. त्यामुळे वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे.
-
(सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख