-
Maharashtra Cabinet: विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) झाला.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात विविध जातीजमातीचे समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला.
-
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३९ जणांपैकी १८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
-
नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
-
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
-
फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात केवळ चार महिलांना स्थान मिळू शकले आहे.
-
पंकजा मुंडे (Pankaja Munde), जिंतूरच्या मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) व पुण्यातील माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या तीनही भाजपच्या महिला आमदार आहेत.
-
आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे.
-
शिवसेनेने (Shivsena) एकाही महिलेला मंत्रीपद दिलेले नाही.
-
मागच्या मंत्रिमंडळात फक्त एकच महिला होती आता चार आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळातील महिलांचं प्रतिनिधित्व ३०० टक्क्यांनी वाढलंय, असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : आमदार/सोशल मीडिया)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख