-
नागपूरचे (Nagpur) सुपुत्र असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे रविवारी (१५ डिसेंबर) उपराजधानीत आगमन होताच विमानतळ ते लक्ष्मीभवन चौक या मार्गावरील विविध चौकांत ढोलताशांच्या निनादात व पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
-
या वेळी ‘देवाभाऊ आगे बढो…’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, अशा घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमून गेला.
-
हॉटेल रेडिसनसमोर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त भाजपने त्याच्या स्वागतासाठी शहरात जंगी तयारी केली होती.
-
ठिकठिकाणी मोठे फलक लावण्यात आले होते.
-
राज्याच्या सर्वोच्च पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी १२ वाजता त्याचे नागपूर विमानतळावर आगमन झाले.
-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.
-
या वेळी विमानतळ परिसरात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
-
‘विजेता तू देवाभाऊ, पुढे चल’ हे गाणे त्यांच्या स्वागतानिमित्त वाजवले जात होते.
-
नागपूरात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पत्नी अमृता फडणवीसदेखील (Amruta Fadnavis) होत्या.
-
अमृता फडणवीस यांनी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने लक्ष वेधले आहे.
-
अमृता फडणवीस यांचं मंगळसूत्र साध्या व सुंदर अशा डिझाइनचे आहे. यामध्ये सोने, काळे मणी व दोन डवल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/सोशल मीडिया)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख