-
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा सोमवारी एक बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या, त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (फोटो: पीटीआय)
-
प्रियांका गांधी संसद भवनात दाखल होत असताना सर्वांच्या नजरा त्यांच्या बॅगेवर खिळल्या. प्रियंका गांधी वाड्रा यांच्या या बॅगेवर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिले होते. यासोबतच पॅलेस्टाईनशी संबंधित अनेक चिन्हेही बनवण्यात आली होती. (फोटो: पीटीआय)
-
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि गाझामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईच्या विरोधात ही बॅग आणली होती. (फोटो: ANI)
-
वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाईनच्या लोकांप्रती आपुलकी व्यक्त करण्यासाठी हे केल्याचे म्हटले आहे. (फोटो: पीटीआय)
-
मात्र, ही पहिलीच वेळ नाही, याआधीही प्रियांका गांधींनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. (फोटो: ANI)
-
यावर भाजपाने प्रियंका गांधी यांना धारेवर धरले असता, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा सरकारने विचार करायला हवा, असा युक्तिवाद त्यांनी केला. (फोटो: पीटीआय)
-
कोण काय म्हणाले?
यावर भाजपा खासदार संबित पात्रा म्हणाले की, गांधी कुटुंबाने नेहमीच तुष्टीकरणाची बॅग उचलण्याचे काम केलेले आहे. (फोटो: पीटीआय) -
त्याचवेळी भाजपा खासदार मनोज तिवारी म्हणाले की, प्रियंका गांधींच्या बॅगेवर पॅलेस्टाईन लिहिले आहे, तुम्ही समजू शकता की त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. काही दिवसांपूर्वीच त्यावर इटली लिहिले होते आणि आता पॅलेस्टाईन लिहिले आहे. भारत नाव कधी लिहिले जाईल माहीत नाही. (फोटो: पीटीआय)
-
पुढे मनोज तिवारी म्हणाले की, ज्याच्या मनात भारताबद्दल प्रेम नाही, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारताबद्दल वाईट बोलतात, भारताच्या लोकशाहीबद्दल वाईट बोलतात, ते भारताचे समर्थक नाहीत. ते पॅलेस्टाईनच्या बाजूचे आहेत. (फोटो: पीटीआय) हेही पाहा- उस्ताद झाकीर हुसेन उत्कृष्ट अभिनेतादेखील होते, ‘या’ चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला त्यांचा अप्रतिम अभिनय
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख