-
वन नेशन वन इलेक्शन विधेयक काल म्हणजेच १७ डिसेंबर रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते त्यावरुन बरेच राजकारण सुरू आहे. संसदेच्या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असली तरी सध्या प्रियंका गांधी सर्वाधिक चर्चेत आहेत. (फोटो: पीटीआय)
-
दरम्यान, अलीकडेच प्रियंका गांधी पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग घेऊन आल्या होत्या. प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईनला दिलेल्या समर्थनावर अनेक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर प्रियांका गांधींच्या दुसऱ्या बॅगची जोरदार चर्चा सुुरु आहे. (फोटो: पीटीआय)
-
प्रियांका गांधी काल संसदेत एका नवीन बॅगसह दिसल्या ज्यावर बांगलादेशमघील हिंदूंच्या समर्थनार्थ घोषणा लिहिलेली होती. बॅगेवर ‘स्टँड विथ द मायनॉरिटीज ऑफ बांगलादेश’ असे लिहिले होते. (फोटो: पीटीआय)
-
केवळ प्रियांका गांधीच नाही तर संसदेत इतरही अनेक महिला नेत्या आहेत ज्या स्टायलिश बॅग आणि लूकमध्ये संसदेत हजेरी लावताना दिसल्या. चला एक नजर टाकूया: (फोटो: पीटीआय)
-
संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल निळ्या साडीत पोहोचल्या. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाची हँड बॅग, शूज आणि जॅकेट परिधान केले. (फोटो: पीटीआय)
-
खासदार कंगना रणौतही साडीमध्ये कमी सुंदर दिसत नाही. अभिनेत्री चष्मा घातलेली आणि निळ्या रंगाची हँडबॅग घेऊन दिसली. (फोटो: पीटीआय)
-
यावेळी टीएमसी खासदार सयानी घोष या स्टायलिश बॅगसोबत दिसल्या. त्यांनी साध्या सूटसह हाफ जॅकेट घातले होते आणि त्याच्याकडे रंगीबेरंगी शालही दिसत आहे. (फोटो: पीटीआय)
-
संसदेत केवळ बॅगच नाही तर सायकलीही चर्चेत होत्या. हे आहेत TDM खासदार अप्पाला नायडू कालिसेट्टी जे हिवाळी अधिवेशनात सायकलवरून संसदेत पोहोचले. (फोटो: पीटीआय)
-
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण पांढऱ्या रंगाच्या शालमध्ये दिसल्या. (फोटो: पीटीआय)
-
एसएडीच्या खासदार हरसिमरत कौर या तपकिरी रंगाच्या हँडबॅगसोबत संसदेत पोहोचल्या होत्या. (फोटो: पीटीआय)
-
हिवाळी अधिवेशनात राज्यसभा खासदार सुधा मूर्ती साध्या साडीत दिसल्या होत्या. त्यांच्यासोबत दोन बॅगा होत्या. एक हँडबॅग आणि दुसरी लॅपटॉप बॅग. (फोटो: एएनआय) हेही पाहा – “….भारताबद्दल प्रेम नाही” ; प्रियांका गांधींच्या ‘पॅलेस्टाईन’ बॅगेवरून पेटलं राजकारण, भाजपाकडून जोरदार टीका

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”