-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत.
-
काल १९ डिसेंबर रोजी राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लक्षवेधी आंदोलनं केली.
-
कालचा संपुर्ण दिवस या आंदोलनांनी गाजवला.
-
इंडिया आघाडीचे खासदार काल आक्रमक झालेले दिसले, तर भाजपाचे नेतेही त्यांना भिडलेले पाहायला मिळाले.
-
अमित शाहांच्या विरोधात संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर इंडियाच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन केले.
-
आंबेडकरांचे फोटो हाती घेत इंडिया आघाडीचे नेते शाहांचा निषेध करताना दिसले.
-
यावेळी गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
-
यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्या निळ्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्यातील शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर मोठे नेते उपस्थित होते.
-
दरम्यान, यावेळी विरोधक आणि सत्तापक्ष आमने सामने आलेले पाहायला मिळाले. त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांनी एकमेकांवर विविध आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- राहुल गांधी सोशल मीडिया)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”