-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (१७ डिसेंबर) राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून गुरुवारी (१९ डिसेंबर) ‘इंडिया’ व रालोआ या दोन्ही आघाड्यांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
-
त्यामुळे संसदेच्या आवारातील वातावरण आधीच तापले होते. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी काँग्रेस व इतर विरोधक खासदारांनी शहांविरोधात निदर्शने केली.
-
त्यानंतर हे सर्व खासदार घोषणाबाजी करत मकरद्वारासमोर आले. त्यावेळी तिथे भाजपचे खासदार आधीच काँग्रेसविरोधात निदर्शने करत होते. दोन्ही बाजूंचे सदस्य आंबेडकरांचे छायाचित्र घेऊनच घोषणाबाजी करत होते. यावेळी दोन्हीकडील खासदार एकमेकांना भिडले.
-
या गोंधळात राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केला. तर ‘‘राहुल गांधी माझ्या अत्यंत जवळ येऊन उभे राहिले व त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ झाले,’’ असा आरोपही एका महिला खासदाराने राहुल यांच्यावर केला. दरम्यान हे आरोप राहुल गांधी यांनी फेटाळून लावले आहेत.
-
राहुल गांधींवर आरोप करणाऱ्या महिला खासदाराबद्दल जाणून घेऊयात
-
दरम्यान या महिला खासदारांचं नाव आहे फान्गनॉन कोन्याक. त्या भाजपाच्या राज्यसभा खासदार आहेत.
-
विशेष म्हणजे त्या नागालँडमधील राज्यसभेवर गेलेल्या पहिल्या महिला खासदार आहेत.
-
त्यांनी होली क्रॉस उच्च माध्यमिक विद्यालय या दिमापूर येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले, पुढे त्यांनी दिल्ली विद्यापिठातून इंग्लीश साहित्यात पदवी प्राप्त केली.
-
कॉलेज जीवनातून त्या विद्यार्थी राजकारणात आल्या. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
-
भाजपाच्या महिला मोर्चाच्या आणि नागालँडच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार पाहिला.
-
मार्च २०२२ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यांच्याकडे परिवहन, पर्यटन, सांस्कृतिक समिती आणि पुर्वोत्तर प्रदेश क्षेत्र विकास मंत्रालयावरील सल्लागार अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार – फान्गनॉन कोन्याक फेसबूक पेज)
हेही पाहा- निळा टी-शर्ट, निळी साडी, हाती संविधान आणि बाबासाहेबांचा फोटो; संसदेबाहेरील आंदोलनातील राहुल- प्रियांका गांधींच्या लूकने वेधले लक्ष

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”