-
Dr. Manmohan Singh Death: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज निधन झालं आहे. ते ९२ वर्षांचे होते. आज २६ डिसेंबर रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. (Photo: Indian Express)
-
दरम्यान डॉ. मनमोहन सिंग हे विद्वान होते. ते मितभाषी, मृदू आणि संवेदनशील नेते होते. २०१० ते २०१४ हे १० वर्ष देशाचा कारभार त्यांनी पाहिला. त्यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात. (Photo: Indian Express)
-
डॉ. मनमोहन सिंग यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब विद्यापीठातून झाले. येथूनच त्यांनी १९५२ मध्ये अर्थशास्त्रात पदवी आणि १९५४ मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. (Photo: Indian Express)
-
प्राप्त माहितनुसार त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी १९५७ मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. (Photo: Indian Express)
-
त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून १९६२ मध्ये डॉ. फिलची (Doctor of Philosophy) पदवीही मिळवली. (Photo: Indian Express)
-
या महत्त्वाच्या पदांवर केले आहे काम
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. येथे त्यांनी व्याख्याता म्हणून काम केले. यानंतर ते दिल्ली विद्यापीठात आले. १९६९ मध्ये त्यांनी भारतातील परकीय व्यापार मंत्रालयात सल्लागार म्हणून काम केले. (Photo: Indian Express) -
१९७० ते १९८० पर्यंत डॉ. सिंग यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. यामध्ये मुख्य आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशा पदांचा समावेश आहे. (Photo: Indian Express)
-
१९९१ मध्ये त्यांना भारताचे अर्थमंत्री बनवण्यात आले. २००४ मध्ये ते पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कार्यभार सुरू केला. (Photo: Indian Express)
-
दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पश्चिम पंजाबमधील एका गावात झाला. डॉ. सिंग हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल झाले. (Photo: Indian Express)
हेही पाहा- Photos : सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राहुल गांधी परभणीत, म्हणाले “ते दलित होते आणि…”

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित