-
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) रात्री ९:५१ वाजता निधन झाले. (Photo: Indian Express)
-
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रात्री आठच्या सुमारास नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ते ९२ वर्षांचे होते. (Photo: Indian Express)
-
यूपीए सरकारमध्ये २००४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणारे डॉ.मनमनोहन सिंग जून २०१४ पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले. (Photo: Indian Express)
-
सिंग यांची भारतातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये गणना होते. त्यांनी देशातील सर्वात मोठी केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे १५ वे गव्हर्नर म्हणूनही काम केले. दरम्यान, डॉ.मनमोहन सिंग यांनी किती संपत्ती सोडली त्याबद्दल जाणून घेऊयात. (Photo: Indian Express)
-
डॉ.मनमोहन सिंग यांनी २०१३ मध्ये पंतप्रधान असताना त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यावेळी मनमोहन सिंग यांच्याकडे काही निवासी मालमत्ता, बँकेतील ठेवी आणि मारुती ८०० कार होती. (Photo: Indian Express)
-
२०१३ मध्ये डॉ. सिंग यांची एकूण संपत्ती १०.७३ कोटी रुपये होती. (Photo: Indian Express)
-
त्याच्या जंगम मालमत्तेबद्दल बोलायचे तर, चंदीगड आणि दिल्लीमध्ये त्यांची दोन घरे होती, ज्यांची किंमत ११ वर्षांपूर्वी ७.२७ कोटी रुपये होती, जी आज अनेक पटींनी वाढली आहे. (Photo: Indian Express)
-
२०१३ मध्ये त्यांच्या एसबीआय बँक खात्यात एकूण ३.४६ कोटी रुपयांच्या ठेवी आणि गुंतवणूक होती. (Photo: Indian Express)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ