-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आदरांजली वाहिली.
-
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्समध्ये ९२ व्या वर्षी निधन झाले.
-
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.
-
सिंग यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल उपस्थित होते.
-
माजी पंतप्रधानांच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे.
-
दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना भारतात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांना आदराचे स्थान होते.
-
१९३२ मध्ये पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेले मनमोहन सिंग २००४ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते.
-
त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. (सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी, अमित शाह सोशल मीडिया)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”