-
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी विमानाचा भीषण अपघात झाला. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
175 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स घेऊन बँकॉकहून येणारे जेजू एअर फ्लाइट 2216 लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हा अपघात भारतीय वेळेनुसार पहाटे ५:३७ वाजता (स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:०७) झाला. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
विमानतळावर उतरत असताना विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. पायलटने लँडिंग गिअरशिवाय विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
मात्र धावपट्टीवर उतरत असताना विमान विमानतळाच्या हद्दीत भींतीवर आदळले आणि स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
विमानाने दोन वेळा उतरण्याचा प्रयत्न केला. लँडिंग गियर पहिल्यांदा उघडण्यात अपयशी ठरल्यानंतर वैमानिकाने विमानतळाला प्रदक्षिणा घातली. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
दुसऱ्यांदा लँडिंग गिअरशिवाय विमान उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
अनेक वृत्तानुसार, विमानाच्या पंखांना पक्षी आदळल्यामुळे लँडिंग गियर खराब झाल्याचा दावा केला जात आहे. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
या अपघातात विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. विमानाला लागलेली आग अधिकाऱ्यांनी विझवली असून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या अपघातात आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
त्याचवेळी, कोरिया टाईम्सनुसार, अपघातातील 181 लोकांपैकी 96 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
या अपघातात आतापर्यंत 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 83 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
तर एपी वृत्तसंस्थेनुसार, अपघातातील 181 पैकी 120 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
बचावकार्य अजूनही सुरू असून विमानाच्या मागील भागातून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
या फोटोंमध्ये घटनास्थळावरील आग आणि धूर दिसत होता. आग आटोक्यात आणण्यासाठी विमानतळ अग्निशमन अधिकाऱ्यांना 43 मिनिटे लागली. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
मात्र, बचाव कार्यात अजूनही अनेक आव्हाने कायम आहेत. अपघातानंतर लगेचच विमानतळावरील सर्व स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
दरम्यान, अपघाताचा बळी ठरलेले विमान बोइंग 737-800 होते, जे अमेरिकन कंपनी बोइंगने बनवले आहे. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
प्रवाशांमध्ये 173 दक्षिण कोरियाचे नागरिक आणि 2 थायलंडचे नागरिक होते. वाचलेले दोघेही चालक दलाचे सदस्य आहेत. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष चोई संग-मोक यांनी बचाव कार्याला गती देण्याचे आणि शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
-
या वेदनादायक घटनेने शेकडो कुटुंबांचा आनंद क्षणात हिरावून घेतला. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे कुटुंबीय दु:खात असून रडत आहेत. घरातील सदस्यांचे अश्रू थांबत नव्हते. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)
हेही पाहा- Photos : ब्रिटनमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशलचा रोमँटिक अंदाज, व्हेकेशन फोटो व्हायरल

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा