-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून महायुतीचा विजय झाला असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे.
-
बारामतीमध्ये अजित पवार २० हजार मतांनी पराभूत झालेले असून युगेंद्र पवार याठिकाणी विजयी आहेत, असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे. अजित पवारांना १,८१,१३२ तर युगेंद्र पवारांना ८०,२३३ इतकी मते पडली होती. जानकर यांच्या दाव्यानुसार युगेंद्र पवारांची ६० हजार मते कमी झाली आहेत.
-
एवढेच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त १२ आमदार निवडून आले असते, असेही ते म्हणाले आहेत. सध्या अजित पवारांचे ४१ आमदार आहेत.
-
उत्तम जानकर यांच्या दाव्यानुसार भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेले आहेत. महायुतीचे मिळून १०७ आणि अपक्ष मिळून त्यांचा आकडा ११० झाला असता, असेही जानकर म्हणाले.
-
तर शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षाचे फक्त १८ आमदार निवडून आले असते, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे (शिंदे) ५७ आमदार निवडून आलेले आहेत.
-
उत्तम जानकर यांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर हे दावे केले आहेत. यावर अद्याप शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनीही ईव्हीएमवर याआधी शंका उपस्थित केलेली आहे.
-
शरद पवार यांनी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी आणि जिंकलेल्या जागांची तुलना करून मध्यंतरी टीका केली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा त्यांच्या गटाला अधिक मते मिळालेली आहेत.
-
राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सुनील राऊत यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा बॅलेटवर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली असून EVM विरोधात लढण्याचा निर्णय त्यांनी बोलून दाखवला आहे.

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश