-
Top 10 biggest and Ruthless dictators: हुकूमशाहीचा इतिहास नेहमीच शक्ती, क्रूरता आणि मानवतेच्या संघर्षाची कथा आहे. हुकूमशहांनी त्यांच्या राजवटीत अनन्वीत अत्याचार केले आणि लोकांच्या जीवनावर त्याचा पूर्णपणे प्रभाव पडला. हुकूमशहांचे शासन नेहमीच मानवी हक्कांचे उल्लंघन आणि क्रूरतेचे प्रतीक राहिले आहे. सत्तेचा गैरवापर समाजासाठी कसा धोकादायक असतो हे या काही हुकुमशाहांवरून लक्षात येते. येथे आपण जगातील १० सर्वात मोठ्या हुकूमशाहांबद्दल बोलणार आहोत, जे इतिहासात त्यांच्या क्रूरतेमुळे कुप्रसिद्ध आहेत.
-
१. ॲडॉल्फ हिटलर (जर्मनी)
जर्मनीचा नाझी नेता ॲडॉल्फ हिटलरने १९३३ ते १९४५ पर्यंत राज्य केले. दुसऱ्या महायुद्धात हिटलरची धोरणे आणि त्याच्या आक्रमकतेमुळे अंदाजे ६ दशलक्ष ज्यूं लोकांचा नरसंहार झाला. हिटलर त्याची राजकीय विचारसरणी, जातीय श्रेष्ठत्वाची विचारसरणी आणि विध्वंसक धोरणांसाठी तो कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, हिटलरने १९४५ मध्ये बर्लिनच्या बंकरमध्ये आत्महत्या केली होती. -
२. जोसेफ स्टॅलिन (सोव्हिएत युनियन)
जोसेफ स्टॅलिनने १९२४ ते १९५३ पर्यंत सोव्हिएत युनियनवर राज्य केले. त्याच्या कार्यकाळाला ‘ग्रेट टेरर’ म्हणूनही ओळखलं जातं, ज्यामध्ये अंदाजे ७ दशलक्ष लोक मारले गेले. लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले किंवा कामगार छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. असे म्हटले जाते की स्टॅलिनच्या काळात आर्थिक सुधारणांच्या नावाखाली लोकांना उपासमार आणि दडपशाहीमध्ये अडकवण्यात आले. १९५३ मध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे स्टॅलिनचा मृत्यू झाला. -
३. माओ झेडोंग (चीन)
१९४९ ते १९७६ पर्यंत चीनवर राज्य करणाऱ्या माओ झेडोंगने “ग्रेट लीप फॉरवर्ड” आणि “सांस्कृतिक क्रांती” सारख्या मोहिमांमधून लाखो लोकांचे प्राण घेतले. माओला २० व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक मानले जाते. त्याच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू झाले, अंदाजे ४ ते ८० दशलक्ष लोक उपासमार, यातना, तुरुंगातील श्रम आणि सामूहिक फाशीचे बळी ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली चीनला आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करावा लागला. १९७६ मध्ये माओचे आजारपणाने निधन झाले. मल्टिपल हृदयविकाराच्या झटक्यांनी माओचे निधन झाले. -
४. पोल पॉट (कंबोडिया)
खमेर रूज नेते पोल पॉट याने १९७५ ते १९७९ पर्यंत कंबोडियावर राज्य केले. त्याने “किलिंग फील्ड्स” दरम्यान सुमारे २ दशलक्ष लोकांची हत्या केली. पोल पॉटला कंबोडियाला कृषीप्रधान समाजात रूपांतरित करायचे होते, ज्यासाठी त्याने शिक्षित लोक आणि शहरी नागरिकांना लक्ष्य केले. पोल पॉटच्या कारकिर्दीत खमेर रूजने कंबोडियामध्ये मोठा नरसंहार केला. या काळात सुमारे १७ ते २० लाख लोकांचा मृत्यू झाला. ही संख्या त्यावेळी कंबोडियाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश होती. पॉल पॉट १९९८ मध्ये नजरकैदेत असताना आजारपणाने मरण पावला. -
५. बेनिटो मुसोलिनी (इटली)
इटलीचे फॅसिस्ट नेते बेनिटो मुसोलिनीने १९२२ ते १९४३ पर्यंत राज्य केले. दुसऱ्या महायुद्धात तो हिटलरचा सहकारी होता. इटलीने त्याच्या हुकूमशाहीच्या काळात लोकशाही गमावली आणि त्याने आपले सैन्य युद्धात ढकलले आणि देशाचा सर्वनाश झाला. ब्रिटीश इतिहासकार कॉर्नरचा अंदाज आहे की दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या बरोबरीने लढण्याच्या मुसोलिनीच्या विनाशकारी निर्णयामुळे ५००,००० हून अधिक इटालियन मरण पावले. यामध्ये नाझी डेथ कॅम्पमध्ये पाठवलेल्या ७,७०० इटालियन ज्यूंचाही समावेश होता. १९४५ मध्ये मुसोलिनीला पकडून इटलीमध्ये फाशी देण्यात आली आणि नंतर त्याचा मृतदेह सार्वजनिक ठिकाणी लटकवण्यात आला. -
६. किम जोंग-इल (उत्तर कोरिया)
किम जोंग-इलने १९९४ ते २०११ पर्यंत उत्तर कोरियावर राज्य केले. त्याने देशाला बाहेरच्या जगापासून वेगळे ठेवले आणि नागरिकांवर कठोर निर्बंध लादले. त्याच्या कारकिर्दीत लाखो लोक उपासमारीचे आणि अत्याचाराचे बळी ठरले. किम जोंग-इलच्या कारकिर्दीत लाखो लोक मरण पावले. उत्तर कोरिया अजूनही हुकूमशाही देशच आहे आणि किम जोंग-इलचा मुलगा किम जोंग-उन राज्य करतो. २०११ मध्ये किम जोंग-इलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. -
७. सद्दाम हुसेन (इराक)
इराकचा नेता सद्दाम हुसेनने १९७९ ते २००३ पर्यंत राज्य केले. त्याच्या कारकिर्दीत कुर्दीश समुदायावर हत्याकांड, रासायनिक शस्त्रांचा वापर करण्य्यात आला आणि राजकीय विरोधकांच्या हत्या यासारख्या घटना घडल्या. आपली सत्ता टिकवण्यासाठी त्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. कुर्दीश नरसंहार (अल-अन्फाल मोहीम) दरम्यान अंदाजे ५०,००० ते १००,००० कुर्द लोक मारले गेले. इराण-इराक युद्ध (१९८०-१९८८) मध्ये सैनिक आणि नागरिकांसह अंदाजे ५ लाख ते १० लाख लोक मारले गेले. सद्दाम हुसेनला २००६ मध्ये इराकमध्ये फाशी देण्यात आली. -
८. ऑगस्टो पिनोशे (चिली)
१९७३ ते १९९० या काळात चिलीवर राज्य करणारा ऑगस्टो पिनोशे हा त्याच्या राजकीय विरोधकांना मारून टाकण्यासाठी आणि छळण्यासाठी कुप्रसिद्ध होता. त्याच्या कारकिर्दीत हजारो लोक बेपत्ता झाले किंवा त्यांची हत्या करण्यात आली. पिनोशेचे २००६ मध्ये त्याच्या राहत्या घरी आजारपणामुळे निधन झाले. मृत्यूचे कारण कळले नाही. -
९. इदी अमीन (युगांडा)
इदी अमीनने १९७१ ते १९७९ पर्यंत युगांडावर राज्य केले. त्याची राजवट क्रूरता, जुलूम आणि अराजकतेसाठी कुप्रसिद्ध होती. अमीनच्या आदेशानुसार सुमारे ३००,०० लोकांची हत्या करण्यात आली आणि त्याने हजारो आशियाई वंशाच्या लोकांना देशातून हाकलून दिले. त्याच्या धोरणांमुळे आणि हुकूमशाहीमुळे युगांडाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. इदी अमीनला “युगांडाचा कसाई” असेही संबोधले जाते. सत्तेचा दुरुपयोग आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याचे भयंकर उदाहरण म्हणजे त्याची राजवट. २००३ मध्ये सौदी अरेबियामध्ये आजारपणामुळे इदी अमीनचे निधन झाले. -
१०. निकोलस काउसेस्कू (रोमानिया)
रोमानियाचा हुकूमशहा निकोलस चाउसेस्कूने १९६५ ते १९८९ पर्यंत राज्य केले. त्याच्या क्रूरता आणि निरंकुश धोरणांमुळे देशाला तीव्र गरिबी आणि अत्याचारांचा सामना करावा लागला. १९८९ मध्ये त्याला सत्तेवरून हटवून फाशी देण्यात आली.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य