-
काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी (१५ जानेवारी) नवी दिल्लीतील ९ए, कोटला रोड येथे पक्षाच्या नवीन राष्ट्रीय मुख्यालयाचे उद्घाटन केले.
-
या सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे त्यांच्यासोबत होते.
-
कार्यक्रमाची सुरुवात पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावून आणि ‘वंदे मातरम’चा जयघोष करुन केली.
-
नवीन मुख्यालयाला “इंदिरा गांधी भवन” असे नाव देण्यात आले आहे.
-
या कार्यालयाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु होते.
-
या इमारतीची पायाभरणी डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती.
-
उद्घाटन समारंभाला संपूर्ण भारतातून ४०० प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित होते.
-
यामध्ये काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, स्थायी आणि विशेष निमंत्रित आणि राज्य शाखांमधील विविध पक्षांचे नेते यांचा समावेश होता.
-
या कार्यक्रमाला PCC अध्यक्ष, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारही उपस्थित होते.
-
यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
-
(सर्व फोटो साभार- राहुल गांधी सोशल मीडिया)

Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार