-
डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी त्यांच्या शपथविधी समारंभानंतर अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये परतले. (Photo via AP)
-
हा समारंभ अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत झाला. (Photo via AP)
-
शपथविधी सोहळ्यासाठी अनेक जागतिक नेते आणि टेक सीईओ एकत्र आलेले पाहायला मिळाले. (Photo via AP)
-
२३० वर्षांहून अधिक काळातील ट्रम्प हे केवळ दुसरे अध्यक्ष बनले आहेत जे एका टर्मच्या अंतरानंतर पुन्हा अध्यक्षपद भूषवणार आहेत.
(Photo via AP) -
दरम्यान, राष्ट्राला पुन्हा आकार देण्याचे आश्वासन देऊन ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. (Photo via AP)
-
थंडीमुळे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आणि बाहेर मैदानावर घेण्यात आला नाही, अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची शपथ ही अमेरिकेच्या संसदेत पार पडली. परंतू या शपथविधी सोहळ्याचा क्षण ऐतिहासिक ठरला. (Photo via AP)
-
त्यांच्या पहिल्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेत आत्तापासून सुवर्ण युग सुरु झालं आहे असं जाहीर केलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख त्यांनी केला. मी त्या हल्ल्यातून वाचलो कारण मला अमेरिकेला पुढे घेऊन जायचं आहे असंही ट्रम्प म्हणाले.. (Photo via AP)
-
ट्रम्प यांनी इमिग्रेशन, ऊर्जा धोरण आणि फेडरल विविधता कार्यक्रम यांसारख्या विषयांवर भाष्य करत कार्यकारी निर्णयांचं पूर्वावलोकन केलं. (Photo via AP)
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच पहिल्या दिवशी २०० पेक्षा जास्त महत्वाच्या निर्णयांवर ते स्वाक्षरी करणार आहेत. (Photo via AP)
-
ज्यामध्ये सीमा सुरक्षा, ऊर्जा यासह राष्ट्रीय सीमा आणीबाणी संदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. याबरोबरच यूएस आर्मी आणि होमलँड सिक्युरिटीला दक्षिण सीमेचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने महत्वाचे निर्देश दिले जातील. (Photo via AP)
-
अमेरिकेत आता सुवर्ण युग सुरु झालं आहे अस डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. (Photo via AP)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”