-
अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून पहिल्या दिवशी कारभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांनी जारी केलेले डझनभर निर्देश रद्द करून अनेक कार्यकारी आदेश जारी केले आहेत. शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भाषणात आक्रमक सूर लावत अमेरिकेच्या सुवर्ण युगाची सुरुवात दाखवत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी महत्वपूर्ण १० निर्णय घेतले आहेत. जाणून घेऊयात कोणते आहेत हे निर्णय? (Photo : Reuters)
-
१) ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया करत असल्याचे सांगत सर्वांना धक्का दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ महामारी आणि इतर संकटांना चूकीच्या पद्धतीनं हाताळलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Photo : Reuters)
-
२) ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानंतर चीनच्या टिकटॉक या अॅपवरची बंदी ७५ दिवस स्थगित करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाला अजून योग्य दिशा ठरवण्यासाठी वेळ मिळेल अशी भूमिका यामागे असल्याचे जाणकार सांगत आहेत. (Photo :ANI)
-
३) डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर इमिग्रेशनला निशाण्यावर घेत कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारने सीपीबी वन नावाच्या बॉर्डर अॅपचा वापर देखील बंद केला आहे. या अॅपने १० लाख लोकांना कायदेशिररित्या कामासाठी पात्र ठरवत अमेरितकेत प्रवेशास मान्यता दिली असल्याचा अंदाज आहे. (Photo :ANI)
-
४) राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की त्यांचे सरकार गुणवत्ता आधारित समाज निर्माण करणार आहे. यापुढे देशामध्ये वंश व लिंगांशी संबंधित गोष्टींना प्राधान्य नसेल. (फोटो-संग्रहित)
-
५) ट्रम्प सरकारचा पहिला कार्यकारी आदेश असा संदेश देतो आहे की अमेरिकन नागरिकांना समृद्ध करण्यासाठी शेजारील देशांवर लादले जाणारे शुल्क वाढवले जाईल. १ फेब्रुवारीपीसून कॅनडा आणि मॅक्सिकोमधील आयातीवर २५ टक्के शुल्क असेल, ही बाब अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे की ते महसूल गोळा करण्यासाठी ‘एक्सटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस” या नावाने संस्था सुरु करणार आहेत. (AP Photo)
-
६) ट्रम्प यांच्या नव्या सरकारने ऊर्जेची गरज भागवण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणीची घोषणाही केली आहे. आम्ही स्वतः एक उत्पादन केंद्र बनू व जगाला वीज निर्यात करु असं ट्रम्प म्हणाले आहेत. ट्र्म्प यांनी तेलाचे व वायूचे उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे.(संग्रहित छायाचित्र)
-
७) ट्रम्प यांनी जो बायडन यांचा इलेक्ट्रिक वाहनांना लक्ष्य करणारा निर्णय रद्द केला आहे. २०३० पर्यंत देशात विकली जाणारी निम्मी वाहने ही इलेक्ट्रिक आहेत याची खात्री करण्याचा प्रयत्न बायडन यांचा होता. पण आता ट्रम्प यांनी २०३५ पर्यंत शून्य उत्सर्जन वाहन नियम स्वीकारण्यासाठी राज्यांना दिलेली सूट संपवायचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ईव्ही टॅक्स रद्द करण्याचा विचार करण्याबाबतही सांगितले. (फोटो – रॉयटर्स)
-
८) ट्रम्प सरकारच्या नव्या आदेशात शासकीय कार्यक्षमता विभागाची स्थापना नमूद करण्यात आली आहे. सरकारकडून विनाकारण होणाऱ्या खर्चामध्ये कपात करणे फेडरल ऑपरेशन व्यवस्थित राबवणे हा त्यामागील उद्देश आहे. २०२४ मधील नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांनी एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियंसी नेते म्हणून नियुक्त केले होते. मात्र विवेक रामास्वामी यांनी यात सहभाग घेतला नाही. (Photo- AP)
-
९) सर्व सरकारी सेन्सॉरशिप थांबवण्याचा उल्लेखही ट्रम्प यांच्या या आदेशात आहे. अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत आणणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणे असा यामागील उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. यावर मात्र टीका करण्यात येत आहे. संग्रहित छायाचित्र)
-
११) अमेरिकेत आता तृथीयपंथींना शासकीय मान्यता नसेल असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. देशात फक्त पुरुष आणि महिला या दोन गटांनाच मान्यता असणार आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या मते आतापासून जन्माच्या वेळी नियुक्त केलेले लिंग बदलता येणार नाही. त्यामुळे अमेरिकेत तृतीयपंथीयांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संग्रहित छायाचित्र)
-
१२) ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यामधील सहभागी आरोपींना माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या समर्थनात या नागरिकांनी कॅपिटलवर हल्ला केला होता असा आरोप होता. १,५९० आरोंपींपैकी १४ वगळता सर्वांची शिक्षा रद्द होईल असं या आदेशात म्हटलं गेलं आहे. (संग्रहित छायाचित्र) हेही पाहा- Photos : व्हाईट हाऊसमध्ये किती खोल्या आहेत? डोनाल्ड ट्रम्प कोणत्या मजल्यावर राहतील?
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख