-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये (Switzerland Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) सहभागी झाले आहेत.
-
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २० ते २४ जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे.
-
यापूर्वी फडणवीस हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते.
-
सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
-
या दावोस दौर्यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर स्वित्झर्लंडमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फडणवीस यांची भेट घेतली.
-
दावोसमध्ये देवेंद्र फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत.
-
या दौऱ्यात उद्याोगमंत्री उदय सामंतही सहभागी झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस/सोशल मीडिया)
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?