-
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी २६ जानेवारी रोजी प्रयागराज महाकुंभ मेळ्यातील संगमात श्रद्धेने स्नान केले.
-
अखिलेश यांनी २०१९ मध्येही अर्धकुंभ मेळ्यात प्रयागराजमध्येच संगममध्ये पवित्र स्नान केले होते.
-
११ वेळा घेतली डुबकी
अखिलेश यावेळी म्हणाले, “येथे तीन नद्या भेटतात – गंगा, यमुना आणि सरस्वती, ज्या आपल्याला एकत्र राहण्याची प्रेरणा देतात. लोक कोणत्याही प्रसिद्धीशिवाय त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेतून येथे येतात.” -
समाजवादी पार्टीच्या सोशल मीडियावरुन अखिलेश यांच्या स्नानाचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
दरम्यान, यापूर्वी १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अखिलेश यांनी हरिद्वारमध्ये गंगेतही स्नान केले होते.
-
या महिन्याच्या सुरुवातीला, प्रयागराज महाकुंभ मेळ्यात जाणार का? असे विचारल्यावर, अखिलेश म्हणाले होते की “मी नेहमीच धार्मिक मेळाव्यांना हजेरी लावतो.”
-
दरम्यान, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसुझा यांनीही महाकुंभ मेळ्यात स्नान केले आहे.
-
त्यांनी स्वतः याबद्दल एक रील व्हिडिओ शेअर केला आणि माहिती दिली आहे. (सर्व फोटो साभार -सोशल मीडिया)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”