-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल (१ फेब्रुवारी) देशाचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला.
-
या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रासांठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
-
ज्यामध्ये १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याबरोबर शिक्षण, शेती, रोजगार, उत्पादन, लघू उद्योगासह विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
-
या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी काय आहे, कोणत्या तरतुदी आहेत याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जाणून घेऊ.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काय आलं? याची माहिती देण्यात आली आहे. -
(टिप :ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)
मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
पुणे मेट्रो : 699.13 कोटी
एमयुटीपी : 511.48 कोटी -
एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी -
महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी -
दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) हेही पाहा- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना महिन्याला किती पगार मिळतो? जाणून घ्या…
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?