-
Delhi Legislative Assembly Elections: राजधानी दिल्ली विधानसभेचा आज (०८ फेब्रुवारी) निकाल जाहीर झाला. (सर्व फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ०५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते.
-
दिल्लीमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. २७ वर्षांनी दिल्लीमध्ये कमळ फुललं आहे.
-
भाजपाने ३७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर आणखी ११ जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे.
-
जर या ठिकाणीही त्यांचा विजय झाल्यास भाजपाची संख्या ४८ वर पोहोचू शकते.
-
भाजपाने आपला धोबीपछाड दिला आहे.
-
काँग्रेसला या निवडणुकीत १ आमदार ही संख्याही गाठता आलेली नाही.
-
आपचे मुख्य नेते असलेले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री आतिशी आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव झाला आहे.
-
मुंबईच्या भाजपा कार्यलयाबाहेर लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती