-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. ही भेट राजकीय नव्हती असं फडणवीस म्हणाले आहेत. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
फडणवीस काय म्हणाले?
राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही कुठलीही राजकीय भेट नाही, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा फोन आला, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी घरी येईन, त्याप्रमाणे मी घरी गेलो होते. ब्रेकफास्ट केला गप्पा मारल्या. या बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होते.” (फोटो – ANI) -
दरम्यान, देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीवर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, कोण काय म्हणाले ते जाणून घेऊयात. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज सदिच्छा भेट झाली – संदिप देशपांडे
मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची भेट झाली नव्हती. आजची भेट ही सदिच्छा भेट होती, यामध्ये राजकीय असं काही नव्हतं, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबद्दल काही चर्चा झाली का? या बद्दल विचारले असता देशपांडे म्हणाले की, आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही. आजची भेट राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात पण राजकारण्यांचे वैयक्तिक संबंध असतात, असेही संदीप देशपांडे म्हणाले. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
“भेट झाली म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली, पण कधीकधी काही कामं असू शकतात, काही मैत्रीचे धागे असू शकतात. त्या माध्यमातून ही भेट होऊ शकते. या भेटीचा उद्देश हा काही राज ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करण्यासाठी गेले असे म्हणणं योग्य होणार नाही. जेव्हा इतक्या खुलेपणे देवेंद्र फडणवीस गेले याचा अर्थ इथे कोणताही राजकीय हेतू नाही हे समजून घ्यायचं,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
प्रकाश महाजन
दोन राजकीय नेत्यांची सहज भेट या दृष्टीने या भेटीकडे पाहिले पाहिजे असे प्रकाश महाजन म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी फडणवीस आले होते. राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता त्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी गप्पा मारावे असे अनेकांना वाटतं, त्यामुळे फडणवीस आले असतील असे महाजन म्हणाले. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्याबाबत अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा असल्याची बातमी सुरु आहे, पण असा काही निर्णय असल्यास तो राज ठाकरे घेतील असंही प्रकाश महाजन म्हणाले. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
संजय राऊत
“राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोलले आहे, इतकेच मला माहीत आहे. तिथे लोक सातत्याने चहापानाला येत असतात. तो कॅफे सर्वांसाठी खुला आहे. राजकारणात असे चहापान होणे, ही चांगली गोष्ट आहे. हा कॅफे चांगला असेल तर तिथे लोक जात-येत राहतात. लोकांना तिथे छान नजारा पाहायला मिळतो, बसायला चांगली मिळते”, असा टोला राऊतांनी लगावला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
छगन भुजबळ म्हणाले…
“फडणवीस साहेब राज ठाकरेंना भेटत असतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात. कदाचित त्या निवडणुकांसाठी चर्चा आहे की काय? मला काही कल्पना नाही पण असू शकते. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ही भेट असू शकेल.” असे छगन भुजबळ म्हणाले. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
विजय वडेट्टीवार म्हणाले..
एकदा पोहे खा, पाहून घ्या असे एकदा झाले, दोनदा झाले. एकदा काय ते शुभमंगल करून टाका, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिला. चर्चावर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळे होणे परवडले, असा आमचा त्यांना सल्ला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ‘किती दिवस लपून लपून प्रेम करणार?’ छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा? जरा खुलके आओ, लोगों को भी पता चलेगा, तुम्हारे प्यार में कितना दम है, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. महानगर पालिकेचे लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी या बालकाचा उपयोग होईल तेवढा करावा, अशी इच्छा असावी, अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र) हेही पाहा- दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण किती कार्यकाळ होतं? वाचा संपूर्ण यादी..
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”